लास्ट लोकल … कल्याण स्टेशन

कल्याण स्टेशनला साडे बारा एक वाजले रे वाजले की भाज्यांचा बाजार भरतो. प्लॅटफॉर्म नं 1, 1-A, 2, 3, 4 वर पद्धतशीरपणे भाज्या मांडून धंदा सुरू होतो. दोन वाजता सेकंड लास्ट कसारा येते. हवालदार उतरतो. वीस- वीसच्या नोटा गोळा करतो. खिशात कोंबून गप गुमान निघून जातो. भाज्या जास्त नसतात. टमाटे असतात हिरवे गार पडलेले. सुकलेल्या भाज्या असतात. भाज्यांतही भेंडी, मेथी चाच भरणा जास्त. धंदा होत नाही त्या भाजीवाल्यांचा जास्त. यात सगळ्या बायकाच. बायकांसोबत त्यांच्या मुली भाजी विकायला पुढे अग्रेसर. त्यांना ठाऊक असतं कुणी भाजी घेणार नाही. तरी बळंच आपलं भाजी साठी आवाज द्यायचा. एखादा बिगारी आला तर दहाएक रुपयाची भाजी घेतो तेवढंच. साधारणपणे धंदा असतो शंभर रुपयाच्या आतलाच. तिथं सोबतीला भेळ पण विकली जाते. काही मुली बिस्किटचे पुडे घेऊन असतात. अख्खी दुनिया झोपते आणि ह्या बायका त्यांच्या मुलींसोबत भाजीच्या धंद्याला बसतात. कुटूंब असलेल्या महिला. त्यांना मुलं,मुली आणि नवराही असतो. नसतं तर ते फक्त घर. होमलेस पीपल या कॅटेगरीत मोडणारे लोकं. बायका अन् मुलींसाठी रेल्वे स्टेशन तसं म्हणायला गेलं सुरक्षितच ठिकाण. म्हणून रात्र झाली की यांचे नवरे आणि मुलं शहरात जिथं जागा मिळेल तिथं पाट टेकतात. बायका स्टेशनवर रात्र काढतात. नॉमीनल हफ्ता दिला की रात्रभर हवालदार पण त्रास देत नाही. बाकी भाजीचा धंदा करत बसणं हे तर निव्वळ ढोंग आहे.

स्टेशनच्या ब्रीजवर त्यांना बसू दिलं जात नाही. बाहेर रस्त्यांवर झोपणं सुरक्षित नाही. आधी स्टेशनवर बाकडे असायचे. आता त्या ठिकाणी स्टिलच्या चेअर्स लावल्यात. म्हणजे माणसं फक्त बसू शकतील तिथं कुणी झोपू शकणार नाहीत. आधी स्टेशनवर चौथरे तरी होते आता ते ही दिसेनासे झालेत. त्यावरही नामी युक्ती लढवलीये. तीन वाजता पहिली ट्रेन दाखल होते सीएसटीसाठी. ट्रेन आली की त्यात शिरायचं ती ट्रेन पाच ला पोहोचते सीएसटीला तेवढे दोन तास पाठ टेकून झोपून घ्यायचं.

यातले कुणी भिकारी नाही. मुंबईच्या उपनगरात चालणाऱ्या कामांत छोटी मोठी कामं करणारी ही लोकं आहेत. ज्यांच्या अन्न, वस्त्र अन् निवारा या मूलभूत गरजा ही पूर्ण होऊ शकत नाही. आपण त्यांना प्रॉब्लेम म्हणतो. वास्तविकतेत बेसुमार सिवीलायझेशनचा एंड रिझल्ट म्हणून घर नसलेला एका मोठा वर्ग आज संघर्ष करत आहे.

स्टेशनवर रात्र काढणारा प्रत्येक माणूस हा गर्दूल्लाच असतो, दारूडा असतो हा समज आपण स्वतःहून दूर करायला हवा. त्यातील कित्येक म्हाताऱ्या बाया मुला-सुनानं घरातून हाकलून दिल्यामुळं स्टेशनवर रहायला आलेल्या असतात. फरक एकच असतो त्यांची स्टेशनं रोज बदलत असतात फक्त दुःख कायम असतं.

वैभव छाया

पूर्वप्रकाशित

‪#‎LastLocal‬

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s