बुद्धाचरण हेच नास्तिकत्व

बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून ते धर्मांतर करण्यापर्यंत तब्बल वीस वर्षांचा कालावधी घेतला. या कालखंडात त्यांनी जगभरातील सर्वच धर्मांचा खुप सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. हा अभ्यास करताना त्यांनी नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही दर्शन पद्धतींचा अवलंब केला आहे.

माझ्या एकुण अभ्यासाप्रमाणे मला ठाऊक असलेली नऊ दर्शनं पुढीलप्रमाणे. त्यातील पहिली सहा दर्शनं ज्यांना षड् दर्शन म्हटलं जातं ती अशी..
न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. ही सहाही दर्शने वेदप्रामाण्य मानतात. वेदांचे अस्तित्व पूर्णतः मान्य करतात. म्हणून त्यांना आस्तिक म्हटलं गेलं आहे. ऊर्वरित तीन दर्शने जैन, बौद्ध आणि लोकायत ही वेदांचे अस्तित्व मुळापासून झिडकारतात. ती नास्तिक आहेत.

राष्ट्र, पितृभूमी, शस्त्रास्त्रांनी युक्त असं राष्ट्र, देशभक्ती वगैरे वगैरे सारख्या संकल्पना कोणत्या नास्तिकत्त्वात बसत नाही. बुद्धाच्या विचार यापेक्षा कोणते वेगळे आहेत.

आता वळूयात बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माच्या स्विकाराकडे…

बाबासाहेबांचं बुद्धाशी आलेलं पहिलं एक्सपोझर हे केळुस्कर गुरूजींकडूनच. भीमा मॅट्रीकच्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी बुद्ध चरित्र भेट दिलं होतं.

बाबासाहेबांनी बुद्धाची विचारप्रणाली ही मार्क्सच्या एकुण एका सिद्धांतावर सुद्धा जोखून पाहीली. बुद्धाचा स्विकार करण्याआधी ईश्वर ही संकल्पना नाकारणाऱ्या कपिलमुनीच्या सांख्य दर्शनाचा त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच बुद्धाचा स्विकार केला आहे.

बुद्धाचा विचार हा विज्ञानवादी आहे. तो कालसुसंगत आहे. त्यात कट्टरता नाही. त्यात तर्कसुसंगतपणा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तिचे स्वातंत्र्य मान्य करताना स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा आखणाऱ्या नियमांना पूर्ण स्थान आहे. बुद्ध टोकाचा विचार नाही. तो सुवर्णमध्य साधण्याचा विचार सुचवतो. बुद्धाने कधीच धर्मसंस्थापक, ईश्वरी अवतार वा ईश्वराचा पुत्र वगैरे असल्याचा पानचट क्लेम केलेला नाही. बुद्धाच्या विचारात लोकशाही आहे. पुरोगामी विचारधारा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधूता ही तत्वे बुद्धाने जगाला दिली. बुद्धाच्या एकुण नितीनियमांमध्ये चर्चेला स्थान होते. संहिता ही संविधानाचं फ्युचरिस्टिक रुप होती. यासारख्या अनेक कारणांमुळेच बाबासाहेबांनी बुद्धाचा स्विकार केला.

बाबासाहेबांनी इस्लाम, ख्रिस्ती आणि शीख धर्माचा स्विकार का नाही केला…
तर बाबासाहेबांचा ओढा तीनही धर्मांकडे गेलाच होता. शीख धर्मीयांची पाच क साठी असलेली सक्ती, शीखांमध्ये असलेली जातीव्यवस्था, कट्टरता त्यांना शीखांपासून क्रमाक्रमाने लांब नेत गेली. बाबासाहेबांचा काळ्या शेरवानी मधला फोटो हा शीख धर्माचा अभ्यास करतानाचा आहे.

इस्लामच्या बाबतीतही तीच गत होती. दार-उल-हरब, दार-ऊल-इस्लाम सारख्या संकल्पना त्यांच्यातील संविधानवादी माणसाला पटणे शक्यच नव्हत्या. शिवाय मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये झालेला जातींचा शिरकाव त्यांना मान्य कसा झाला असता…

बुद्धाचा स्विकार करणारे नास्तिक असतात.. बुद्ध आचरण्याची गोष्ट आहे.. पाळण्याची नाही.

वैभव छाया

फेसबुक लिंक

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s