डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित साहित्याचे भाषांतर होताना ज्या चुका झाल्यात त्या संदर्भातील एक निरिक्षण…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित साहित्याचे भाषांतर होताना ज्या चुका झाल्यात त्या संदर्भातील एक निरिक्षण…

चळवळीतील अनेक जण बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि मार्क्स यांचा संदर्भ देताना बुद्ध कि मार्क्स असा उल्लेख करतात. खरेतर बाबासाहेबांनी लिहीलेल्या मूळ प्रबंधाचं शीर्षक हे Buddha and Karl Marx असे आहे. परंतू प्राथमिक काळातील काही प्रकाशकांनी आणि व्याख्यात्यांनी याचा उल्लेख Buddha Or Karl Marx असा सातत्याने केला. या ग्रंथाचे भाषांतर होताना बुद्ध की मार्क्स असे चूकीचे भाषांतर केले.

याला प्रामुख्याने दोन गोष्टी जबाबदार असाव्यात असे वाटते. यातील पहिली गोष्ट म्हणजे आंबेडकरी साहित्यावर आंबेडकरी कुटूंबाने कोणताही कॉपीराईट ठेवलेला नाही. त्यामुळे कोणताही प्रकाशक बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित असलेले 52 ग्रंथ पुन्हा प्रकाशित करू शकतो. यामुळे झाले असे की, अनेक हवश्या प्रकाशकांनी आधीचे उपलब्ध असलेले मॅन्यूस्क्रिप्ट जसेच्या तसे डीटीपी करून, भाषांतर तपासण्याची तसदी न घेता प्रकाशित केले.

दुसरी गोष्ट अशी की, डाव्या चळवळीकडून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची झालेली परवड आणि कम्यूनिस्ट राजकारण्यांकडून बाबासाहेबांना निवडणूकीच्या राजकारणात झालेला दगाफटका हा अजूनही बहुतांश कार्यकर्त्यांच्या मनात घर करून आहे. त्याची फलश्रुती बाबासाहेबांनी दिलेल्या शीर्षकाचे चूकीच्या पद्धतीने उच्चारण करण्यात झालेले आहे. सोबतीने हे सुद्धा नमुद करावेसे वाटते की बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स आणि बुद्धा यांच्या विचारांचे आधुनिक काळात जोखून पहायचे मापदंड सारे काही या ग्रंथात विशद करूनच बुद्धाचा स्विकार केला आहे.

दुसरा मुद्दा भाषांतराबाबत असलेल्या चुकीचा…

what congress and gandhi have done to the untouchables…

या बाबासाहेब लिखित पुस्तकाचे मराठी भाषांतर करताना शीर्षकाच्या बाबतीत पुन्हा एकदा मोठी चूक झालेली आहे. ती अनेकदा अनेक प्रकाशकांना पत्रलेखन करून कळवलेली आहे. त्यानंतर काही प्रकाशकांनी पुन्हा प्रकाशित करताना त्या चूका सुधारल्या त्यासाठी त्या प्रकाशकांचा मी आभारी आहे.

what congress and gandhi have done to the untouchables… या शीर्षकाचा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला अर्थ आणि मूळ भाषांतर असे हवे होते.

काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांचे काय केले…

परंतू शीर्षकाचे भाषांतर असे केले होते..

काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले…
शीर्षकातील ही चूक विषयाला मोठा फाटा देणारी ठरली होती.

तीसरा मुद्दा टर्मीनोलॉजीचं भाषांतर करण्याबाबतचा…

द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे तसे पहायला गेले तर दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे कोलंबिया विद्यापीठात असताना प्रकाशित झालेला ग्रंथ तर दुसरा भाग म्हणजे बाबासाहेबांच्या शेवटच्या दिवसात त्यांनी या ग्रंथाची सुधारित आवृत्ती तयार करून ठेवल्याचे संदर्भ बाबासाहेब आणि नानकचंद रत्तू यांच्या अनेक संवादात आलेले आढळून येतात. तो पुढचा भाग आलेला नाही. का आला नाही.. यावर आपण जरूर मेहनत घ्यायला हवी.

या ग्रंथात सुवर्ण विनिमय दरा संदर्भात असलेल्या अनेक संज्ञांचे भाषांतर करताना काही प्रकाशकांनी अक्षम्य चूका केलेल्या होत्या. ह्या चूका 1970 पर्यंतच्या प्रिटिंग मध्ये होत्या. 1990 नंतर आलेल्या प्रिंट्स मध्ये त्या सर्व चूका गाळण्यात आलेल्या होत्या. बहुतेक ते काम डॉ. सुखदेव थोरात यांनी केलेले असावे असा अंदाज आहे. त्याबाबतची पक्की माहीती नाही. आपल्याकडे असल्यास कृपया कळवावे. मला करेक्ट करावे.

चौथा मुद्दा…

बुद्धा अँड हिज धम्म या ग्रंथात अनेक प्रकरणे आहेत. या प्रकरणांमध्ये बुद्धाच्या अनेक वचनांचा मराठीत अनुवाद करतानाही अर्थ तर बदलला जात नाहीये ना याची काळजी घेण्यात आलेली नव्हती. काही प्रकाशकांनी तर मनाला येईल तसे भाषांतर केलेले होते.

सर्व उदाहरणे येथे देता येणे शक्य नाही. परंतू एक देत आहे.

सदर ग्रंथातील शेवटच्या प्रकरणातील एक उपप्रकरण त्यात बुद्धाचे इच्छा आणि गरज यासंबंधी विवेचन आहे. त्याचे मूळ शीर्षक बाबासाहेबांनी Need & Wants असे ठेवलेले होते. ही प्रिंट 1960 सालातली होती. मी बुद्धा अँड हिज धम्म सर्वप्रथम वाचला तो 2006 साली तेव्हा उपलब्ध असलेलं मराठी भाषांतर हे 2004 साली प्रकाशित झालेलं होतं. आणि त्यात या शीर्षकाचे भाषांतर इच्छा आणि आसक्ती असे केलेले होते. जे पूर्णतः चूकीचे होते. यावर 2010 साली एका प्राध्यापक मित्राने प्रकाशकांना पत्र लिहून चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर 2011 साली आलेल्या सुधारित आवृत्तीत इच्छा आणि गरज असे बदल केलेले होते.

सरतेशेवटी…

बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेएवढं हुशार नंतर कुणीही झालं नाही की ज्यांचा प्रत्येक क्षेत्रातील वावर आणि व्यासंग त्यासोबतचं आकलन त्यांच्यासारखाच असेल. बाबासाहेबांच्या नंतर शिक्षणाची ज्योत खऱ्या अर्थाने तेवू लागली. आज तीनं चांगली आग पकडलीये. ह्या चूका होतच राहणार. पण चूका सुधारून पुढे जाण्याचं या चळवळीने आजवर नाकारलेलं नाही हे अधोरेखित करण्याजोगे आहे.

दुसरे असे की, आंबेडकर कुटूंबियांनी या ग्रंथसंपदेवर मालकी हक्क पुन्हा कायम करावा जेणेकरून या साहित्याला पुन्हा एकदा शुद्ध स्वरूपात आणण्याची मोहीम हाती घेता येईल. कदाचित हा विचार व्यवहार्य नसेलही. परंतू आपण आपले मत मांडू शकता.

ता.क.
मी आंबेडकरी कुटूंब म्हटले आहे म्हणून रागावून जाऊ नका.
आणि आंबेडकरी घराणेच म्हण असा सल्लाही देऊ नका.

वैभव छाया

 

 

 

 

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s