डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण..

“आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुभंगले आहोत याची मला जाणीव आहे. आपण विरोधी छावण्या करून आहोत आणि मी स्वतः ही कदाचित युद्धाची छावणी उभारलेल्या एका जमातीचा नेता आहे.” असे असले तरी माझी पूर्ण खात्री आहे की, परिस्थिती आणि समय काळ येताच आपण एक झाल्याशिवाय राहणार नाही. जरी जाती नी पंथ अनेक असले तरी आपण एक राष्ट्र होऊ याविषयी माझ्या मनात शंका नाही. मुस्लीम जरी भारताच्या फाळणीसाठी चळवळ करीत आहेत, तरी एकदा त्यांच्या मनावर परिणाम होऊन अखंड भारत सर्वांसाठी जास्त हितकर असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ता ही गोष्ट वेगळी आणि शहाणपणा नी दूरदर्शीता ही गोष्ट वेगळी. बर्फने म्हटल्याप्रमाणे ‘सत्ता देणे एकवेळ सोपे आहे परंतु शहाणपण देणे कठीण आहे.’ राष्ट्राचे भवितव्य ठरवतांना व्यक्ती किंवा राजकीय पक्ष यांच्या प्रतिष्ठेला महत्व देण्यात येऊ नये. “देशातील सर्व लोकांना एकत्र नेण्याची आणि शेवटी एकी होईल असे मार्ग स्वीकारण्याची आपल्या अंगी ताकद आणि शहाणपणा आहे हे आपल्या वर्तनाने प्रत्ययास आणू या.”

‘राज्यघटना कितीही चांगली किंवा वाईट असली तरी शेवटी ती चांगली वाईट ठरणे हे जे राज्यकर्ते तिचा वापर कसा करतील यावरच अवलंबून आहे.’ हिंदूच्या जातीभेद आणि पंथभेद या जुन्या शत्रूंमध्ये परस्परविरोधी असलेल्या नवीन पक्षांची भर पडली आहे. या जाणिवेमुळे माझी चिंता दुणावली आहे. जर पक्षांनी आपले पक्षमत राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे नष्ट होईल. म्हणून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करताना घटनात्मक साधनांचा मार्ग अवलंबिला पाहिजे. असहकार, कायदेभंग, आणि सत्याग्रहाचे मार्ग वर्ज्य केले पाहिजेत.

हे घटनाबाह्य मार्ग म्हणजे केवळ अराजकतेची बाराखडी होय. लोकशाहीला दुसरा धोका विभूतीपूजेचा आहे. जॉन स्टुअर्ट मिल लोकशाहीच्या संरक्षकास इशारा देताना म्हणतो, “एखादा माणूस कितीही थोर महान असला तरी त्याच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये. ज्या थोर लोकांनी आयुष्यभर राष्ट्रसेवा केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी परंतु कृतज्ञेस मर्यादा असावी. आयरिश देशभक्त आकोनेल म्हणतो,” आपल्या अब्रुचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. स्वाभिमानाचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही. केवळ राजकीय लोकशाहीत समाधान मानू नये. राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीत परिवर्तीत केले पाहिजे. सामाजिक लोकशाही समता, स्वातंत्र्य व बंधुता या जीवनमूल्यांना ओळखते. सामाजिक समता नसेल तर मूठभर लोकांचे राज्य जनतेवर असल्यासारखे होईल.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
यांचे संविधान सभेतील भाषण..
अधिक संदर्भासाठी राज्यसभा टिव्हीवर प्रसारित झालेल्या संविधान या मालिकेतील शेवटचा भाग पहावा. किंवा चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित खंडातील संविधान सभेचा खंड पहावा.

‪#‎ThanksAmbedkar‬

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s