नैतिकतेचे ओझे

बुद्ध बोधकथा -1

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने……..

एक फार जुनी बौद्ध कथा आहे. दोन बौद्ध भिक्खू नदी ओलांडण्याकरीता नदीच्या तीरावर आले. त्या दोन भिक्खूमधील एक तरूण होता, तर एक व्रुद्ध होता.त्या दोघान्नी नदीच्या तीरावर एक लावण्यवती तरूणी पाहिली. तिच्या अंगावर भरजरी देखणे कपडे होते. गळ्यात मौल्यवान दागिने होते. पायात मखमली चढाव होते.

व्रुद्ध भिक्खू पुढे होता. तरूण भिक्खू त्यांच्या मागून चालला होता. मोठ्यान्ना मान देण्याची एक प्रथा होती. व्रुद्ध भिक्खूने त्या तरूणीला पाहाताक्शणी आपली नजर खाली पाडली व चालू लागला. संघाचा तसा नियमच होता. जर अचानक एखादी स्त्री समोर आली तर तिच्या पायाच्या नखाकडे बघा. स्त्रीच्या चेह-याकडे पाहू नका.
ती सुन्दर तरूणी मागे असलेल्या त्या तरूण भिक्खूला म्हणाली, “भंते, मला नदी पलिकडे असलेल्या गावात एका समारम्भाला जायचे आहे. सन्ध्याकाळ होत आली आहे. इथ एखादा मचवा अथवा नाव दिसत नाही. ह्या चिखलात माझे मखमली वस्त्र खराब होतील. पाण्याने माझे भरजरी रेशमी वस्त्र ओली होतील. तरी क्रुपया पलिकडे जाण्याकरीता मला मदत कराल का? मी तुमची आभारी राहीन. माझ्या हाताला हात देता का?”

म्हातारा भिक्खू नदीतून घाईत चालला होता. परंतू मन त्या स्त्रीत गुंतले होते. मनात वाईट विचार येताक्शणी नदीच्या शीतल वा-यात देखील त्याला घाम फुटला. चाळीस वर्षाचे नियम , व्रत मातीमोल होतील म्हणून तो अत्यंत घाबरला. जेव्हा त्याने नदी पार केली तेव्हा त्याला आपल्या तरूण सहकार्याची आठवण झाली. तो आपल्या मागे आहे की त्या संकटात तो फसला तर नाही ना? असा विचार करून त्याने मागे वळून पाहिले.

तर तो तरूण भिक्खू तिच्यासोबत असलेला दिसला. ती म्हणत होती, ” भंते, माझ्या हाताला हात द्या.” तेव्हा तो म्हणाला, “नदी खोल आहे. हातात हात देवुन चालणार नाही. तसेच आपल्या अंगावर उंची वस्त्र आहेत ती भिजतील. आपल्या सुन्दर मखमली चढावा चिखलाने बरबटतील. आपण माझ्या खान्द्यावर बसा.” त्याने आपले चिवर कम्बरेला बान्धले आणि बाहुलीला उचलावे तसे तिच्या कम्बरेत हात घालून तिला उचलले व खान्द्यावर बसवुन नदी पार केली.
हे सर्व पाहून व्रुद्ध भिक्खूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो रागाने फणफणला. हे सर्व त्याचा सहनशक्तीच्या पलिकडील होते. दोघेही विहाराच्या दिशेने चालू लागले. चार-पाच मैलापर्यंत व्रुद्ध काहीच बोलला नाही. क्रोधामुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटला नाही. परंतू जेव्हा विहार जवळ येउ लागले तसा तो व्रुद्ध भिक्खू त्या तरूण भिक्खूला म्हणाला, ” तू जे काही केलस ते महापाप आहे. मी ते दडवणार नाही. मला ते गुरूला सांगावेच लागेल. तू त्या तरूणीला खान्द्यावर बसवलेस. तू तर परिसिमाच सोडलीस. तू संघाचे नियम तोडलेस. तुला शिक्श्या व्हायलाच हवी. “

त्यावर तो तरूण भिक्खू म्हणाला, ” भंतेजी, त्या तरूणीला मी केव्हाच नदी किनारीच सोडून आलोय. परंतु तुम्ही अद्याप तिला पाहाताय याच मला आश्चर्य वाटतेय. तो बोजा तुम्हाला जड नाही का वाटत? “

‪#‎Buddha

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s