लाल मिर्च वाला गोश्त…

गोश्त म्हटलं की मोठ्याचंच हा समज आता फडणवीस सरकारनं पुसून काढायला कायदेशीर मदत केलीये. त्यामुळे महाराष्ट्रात जेव्हा केव्हा गोश्त हा शब्द उच्चारला जाईल तेव्हा फक्त मटनाचाच विचार करावा ही नम्र विनंती. लाल मिर्च वाला गोश्त हा मटणाचा सर्वात सोपा, मस्त पण तितकाच झणझणीत बनणारा पदार्थ आहे. ज्यांना तिखट आवडत नाही, ज्यांना मिर्ची सहन होत नाही किंवा ज्यांना अधिक लाल रंगाचं जेवण आवडत नाही, थोडक्यात तर्री आवडत नसलेल्यांसाठी ही डिश नाही आधीच लक्षात घ्यावं.

अत्यंत साधी रेसिपी आहे. जमल्यास आजच घरी ट्राय करून पहा. वातावरण गेल्या तीनेक दिवसांपासून बदलंलंय. ताप, सर्दी, खोकला, पोट पकडलंय अनेकांचं. तर फक्त साध्या स्टीम राईसबरोबर लाल मिर्च वाला गोश्त मस्त उत्तर आहे.

डिशची पहिली महत्त्वाची स्टेप अशी की, योग्य भागातलं मटण निवडणं. चाप, आणि मांडी. त्यातही हाडं असलेली मटणाचे तुकडे महत्त्वाचे. बोनलेस मटणाचे येथे काम नाही. दुसरं महत्त्वाचं… मटण शिजवताना कायम प्रेशर कुकरचा वापर करावा. ह्याचे दोन प्रमुख कारण..

  1. मटण वेगात शिजतं. गॅस कमी वापरला जातो. इंधन बचत होते. वेळ वाचतो.
  2. मटण अगदी जब्राट शिजतं. शिवाय पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व वाफेबरोबर उडून जात नाहीत. उदा. ब गटातील जीवनसत्त्वे… शिवाय मसाल्यांचा फ्लेवर आणि गंध शाबूत राहतो …


आता मुख्य कृतीकडे वळूयात. साहित्य नेहमीचेच. बेसिक फोडणीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जवळ ठेवाव्यातच. प्रेशर कुकर मध्ये बटर किंवा तुप टाकावं. त्यात तीन ते चार कांदे पूर्णतः तळून निघतील एवढंच टाकावं. साधारण अर्धा किलो मटणासाठी तीन ते चार कांदे पुरेसे होतात. कांद्याचा बरिस्ता झाला की त्यात लगेच मटण, तीन मोठे चमचे अद्रक-लसूनची पेस्ट, थोडीशी हळदी टाकून किमान चार शिट्या होऊ द्याव्यात. कुकर मध्ये मटण जेवढा भाग व्यापेल त्याच्या दिडपटच पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकावं. मटण स्वतः पाणी सोडतं म्हणून दिडपट पुष्कळ झालं. मीठ टाकल्याने जरा लवकर शिजतं.

मटण शिजत असताना.. दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात जवळपास दहा ते पंधरा लाल मिर्च्या, चार हिरव्या मिर्च्या, तीन तेजपत्ते, एक मोठा चमचा काळे मीरे, दालचिनी, जीरे, दोन मोठे चमचे धने, पाचेक हिरवी इलायची, दोन मोठी इलायची, दगडफुल आणि थोडी खसखस अगदी अर्धा चमचा… पाण्यात जवळपास दहा ते पंधरा मिनिटे फुल स्पीड मध्ये उकळू द्यावेत. प्रॉपरली उकळल्यानंतर सर्व खडा मसाला गाळून घ्यावा. ह्या मसाल्यातून उरलेलं पाणी हे वेगळं काढून ठेवावं. आणि गाळून घेतलेला मसाला थंड करून त्याची पेस्ट बनवावी. तोवर कुकरच्या चार शिट्या देखील झालेल्या असतील तर ते ही थंड करून घ्यावं.

त्यानंतर तयार पेस्ट मटणात टाकावी आणि मटण व्यवस्थित परतून घ्यावं. थोडंसं पाणी आटलं की त्यात खडा मसाला गाळून घेतल्यानंतर उरलेलं पाणी घालून पुन्हा एकदा शिजू द्यावं. यात टमाटे अॅड करायचे नाहीत. किंवा दही सुद्धा अॅड करायचे नाही. ते अॅड न करणं हीच या रेसिपीचे सिक्रेट इनग्रेडियंट आहेत. बस्स … पुदीना, कोथिंबीर टाकून द्या… आणि स्टीम राईस बरोबर खा.. या रेसिपीत लेमन ज्युस ऑप्शनल आहे. शक्य असेल तर कसूरी मेथी टाकली तरी चालेल..

एकदम झणझणीत तर्रीवाला लूक आला पाहीजे…

वैभव छाया

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s