अण्णाभाऊंचं हायजॅक

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे… किंवा
कॉम्रेड अण्णा भाऊ साठे
आंबेडकरी चळवळीनं कायमच अण्णा भाऊंना लोकशाहिर म्हटलं. तर डाव्या चळवळीनं हटकून कॉम्रेड असाच उल्लेख केला. कम्यूनिझम शी माझं फारसं वाकडं नाही. माझं वाकडं डाव्यांशी आहे. डाव्यांच्या नालायकपणाशी. तो नालायकपणा मागास जातींतून येणाऱ्या डाव्यांत नाही हे ही तितकेच निक्षून सांगतो आहे. थोडाथोडका नव्हे तर तब्बल बारा वर्षांच्या अनुभवानंतर हे विधान करतो आहे. हे जरूर अधोरेखित करून वाचावे.
 
अण्णा भाऊंनी ऐन उमेदीच्या काळात डाव्या चळवळीला, डाव्या पक्षांना भरभरून योगदान दिलं. बदल्यात डाव्या पक्षांनी अण्णा भाऊंना किती सांभाळंलं? किती सहकार्य़ केलं हा वादाचा मुद्दा आहे असं मी म्हणणार नाही. तर स्पष्टपणे सांगता येईल. अण्णा भाऊंच्या शेवटच्या काळात डाव्या चळवळीनं आपलं अॅसेट सांभाळलं नाही. रशियात फकिराचं रशियन भाषांतर नेहरूंच्या हस्ते प्रकाशित झाल्यानंतर अण्णाभाऊंनी तत्कालीन सरकारनं नेहरूंच्या आदेशानुसार फ्लॅट दिला. पैसे दिले. अण्णा भाऊंच्या नातलगांनी भोळ्या अन् भावूक असलेल्या अण्णा भाऊंना फसवून फ्लॅट आणि पैसे बळकावून पुन्हा त्यांची रवानगी रमाबाई कॉलनीत करून दिली.
 
शेवटच्या दिवसात त्यांना उपचारासाठी पैशांची गरज होती. तेव्हा त्या काळातील उच्चवर्गीय, वर्णीय डावे सहज त्यांचा खर्च उचलू शकले असते पण तशी नोंद कुठेही नाही. नोंद एवढीच की बलराज साहनी यांनी अण्णा भाऊंना त्यांच्या मोटारीतून पुन्हा त्यांच्या गावी नेऊन सोडलं. हाच भाग प्रचंड रंगवून सांगितला जातो. याच अण्णा भाऊंनी त्यांच्या कादंबऱ्या भालजी पेंढारकरांना सिनेमा बनवण्यासाठी अवघ्या 52 रुपयाला विकल्या होत्या. त्या एवढ्या कमी रकमेला घेताना विकत घेणाऱ्यालाही लाज वाटली नाही. आणि ती विकू न देण्याचं औदार्य़ सुद्धा एकाही डाव्याला तेव्हा दाखवू वाटलं नाही.
 
अण्णा भाऊंचा डाव्या चळवळीकडून किती भ्रमनिरास झाला हे आपण आता ठरवू शकत नाही. ते ठरवू ही नये. सवर्ण डाव्यांनी कायमच मागासवर्गीय डाव्यांना फुटसोल्जर म्हणून वापरलंय. आजही वापरतायेत. म्हणून नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक होणारे कांबळे, साळवे, पगारे, गांगुर्डे असतात.. जोशी, कुलकर्णी, करात, येचूरी असत नाहीत. वाईट याचंच वाटतं की ही गोम साळवे, गांगुर्डे, पगारेंना कळत नाही.
 
आता डाव्यांकडून हायजॅक होऊन गेलेले अण्णा भाऊ संघाच्या विंगकडून हायजॅक केले गेले आहेत. पिवळ्या रंगात रंगवून मातंगांचं खंडेरायाशी असलेलं कुलदैवताचं नातं जोडून जातीय अस्मिता अधिकाधिक घट्ट करण्याचं कारस्थान चालू आहे. ते आपल्याला दिसत नसावं इतके तर आपण आंधळे नाही. अण्णा भाऊंच्या जयंतीलाच डि-कास्ट, डि-क्लास झालेल्या अण्णाभाऊंचा खून झालेला पहायला मिळतोय.
 
फार काही बोलणं योग्य राहणार नाही.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s