सर्जरीला सामोरं जाण्याआधी …

एका मित्राशी चॅटवर बोलत होतो. येत्या काळात त्याच्या सर्जरी होणार आहेत. मी स्वतः अनेकदा अशा प्रसंगाना सामोरा गेलो आहे. त्यामुळे काही सल्ले येथे द्यावेसे वाटत आहेत.

1) बऱ्याच वेळेस ऑपरेशन अपॉईंटमेंट मिळून होत असते. त्यामुळे सर्जरीच्या दिवसापर्यंत आपली मानसिक स्थिती ही अतिशय भक्कम असणे गरजेचे असते. आणि ती सर्वस्वी आपल्याच हातात असते.
2) जास्तीत जास्त मेडीटेशन, आनापानसती, विपश्यना सारख्या मार्गांचा अवलंब करावा.
3) श्वासावर अधिकाधिक नियंत्रण कसे मिळवता येईल यावर लक्ष ठेवावे.
4) रक्तदाब वाढेल अशा कोणत्याही परिस्थीतीना सामोरे जाणे टाळावे.
5) रक्तात प्लेटलेट्स, हिमोग्लोबीन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे विशेष लक्ष द्यावे. उगाच रक्त किंवा प्लेटलेट्स विकत घेण्याची परिस्थीती येऊ देऊ नये. आणीबाणीच्या वेळी ते रक्त इतरांसाठी उपयोगात येऊ शकतं.
6) खांदे, जांघा, कोपर, मनगटं आणि मानेचे स्नायू जास्तीत जास्त लवचिक ठेवण्यावर भर द्यावा.
7) मसाल्याचे, तळलेले, तेलकट, तुपकट पदार्थ खाणे पूर्णतः बंद करावे.
8) दोन आठवड्यांआधीपासून आठवड्यातून एकदा असे पोट पूर्ण स्वच्छ करणारे एखादे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
9) हाताला मेहंदी, नेलपेंट किंवा अंगावर कुठेही टॅटू काढू नये. असल्यास रिमुव करण्यावर जास्त भर द्यावा.
10) आम्पलपित्त वाढवणारे सर्व घटक वर्ज्य करावेत.
11) जास्तीत जास्त झोप घेणे बंधनकारक.
12) पाठ, पृष्ठभाग डोक्याचा मागचा भाग नीट तपासून घ्यावा. शरीराच्या पाठीवरील संपूर्ण भागात जर कुठे स्किन प्रॉब्लेम असेल तर वेळीच उपाय करून घ्यावा.
13) सर्जरीनंतर बराच काळ रबर शीट वर झोपावे लागते त्यामुळे पुन्हा त्रास होण्याची शक्यता जास्त.
14) डोक्यावरचे आणि शरीराच्या ज्या भागाचे ऑपरेशन होणार आहे तेथील केस साफ करावेत.
15) स्वेट पॉकेट्स जास्तीत जास्त स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी.
16) बसल्या बसल्या गुडघ्याचे व्यायाम आणि मनगटांच्या स्नायुंचे व्यायाम करावेत.जेणेकरून हाताच्या नसा अगदी ठळकपणे वर येतील. उगाच सुई टोचून टोचून हाल होणार नाहीत.
17) सर्जरी ला जाताना शक्यतो स्वतः धीराने सामोरे जावे. कोणाचाही आधार घेणे टाळावे.
18) सर्जरी झाल्यानंतर आपले डोळे बहुतेक आयसीयुमध्येच उघडतात. ज्या क्षणाला डोळे उघडतील त्या क्षणापासून लवकरात लवकर उठून बसण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून एनस्थेशियामुळे अवघडलेले अवयव पुढे जाऊन त्रास देणार नाहीत.
19) पेन किलर्सचा वापर शक्यतो टाळावा.
20) अॅलेक्स, कोरेक्स सारखे कफ सिरफ पूर्णपणे टाळावीत.
21) हॉस्पीटल मध्ये भेटायला आलेल्या लोकांना शक्यतो भेटणे टाळावे.
22) इंफेक्शन होईल अशी कोणतीही शक्यता निर्माण होऊ देऊ नये.
23) डॉक्टर्स जे सांगतील ते तंतोतंत ऐकावे.
24) आपले मेडिकल रिपोर्ट्स सातत्याने इंटरनेटवर किंवा इतर डॉक्टर मित्रांच्या सहाय्याने सेकंड ओपिनियन मध्ये घेत रहावे.
25) आपल्याला सुचवलेली औषधी ही कुठे स्वस्तात मिळतील, त्याचे स्वस्त सबस्टीट्यूट स्वतः डॉक्टरला विचारून घेणे हा प्रत्येक पेशंटचा अधिकार आहे,…
26) सर्जरीनंतर एखादा अवयव काढून टाकला जाणार असेल तर डोक्याला शॉट नाय लावून घ्यायचा. फक्त विचार करायचा की साला मला 60 % पेक्षा जास्त अपंगत्वाचा सर्टिफिकेट मिळालं तर किमान प्रवासाची मोठी सवलत मिळेल. तीन टक्क्यांचं आरक्षण मिळेल. बाकीची टेंशन आपोआप गळून पडतील.
27) जे डॉक्टर लोक भूल देतात त्यांच्याशी कधीच खोटं बोलायचं नाही. जेवढं वजन आहे तेवढंच लिहू द्यायचं. आधी कधी आयु्ष्यात काय ढिनच्याकगिरी केलेली असेल तर ती देखील बिंदास कबुलीजबाब देऊन मोकळं व्हायचं. Amar Powar
28) शक्यतो हॉस्पीटल मधून देण्यात येणारे जेवणच प्रेफर करा. जे मी कधीच केलं नाही. त्याचे परिणाम पण भोगले.
29) हॉस्पीटल मधल्या सगळ्या वॉर्डबॉय, बटलर लोकांशी मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. कसलीच अडचण येणार नाही. एक्सरे, स्कॅनिंग वगैरे साठी कधी रांगेत राहण्याची गरज पडणार नाही.. हाहाहाहा
30) आणि सगळ्यात शेवटी… एकदा थोडे नीट झालात की फोडा रोज गुडसे.. लवकर दणदणीत दणकट व्हाल..

माझा हा चौदा वर्षांत झालेल्या सोळा सर्जरींचा अनुभव आहे. प्रत्येक वेळेस बारा ते पंधरा तास.. धम्माल केलीये ओटीमध्ये.. आणि खरं सांगतो.. 2006 साली झालेल्या सर्जरीत डॉ. मनदिप शहाच्या नोकीया 6600 झलक दिखला जा ऐकत ऐकत सामोरे गेलो होतो. मग सांगा मला जास्त कशाची भीती वाटायला पाहीजे होती.. हिमेशची की पाय काढून टाकल्याची.. हाहाहाहा

वैभव छाया

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s