ब्रँड गुरू-बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब अव्वल दर्जाचे ब्रँड गुरू होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लोकांना काय अपील करेल आणि ते कसे साध्य केल्यास अपील होईल याची अतिशय सुक्ष्म जाण त्यांच्याठायी होती. जरा विस्तारानं पाहू.

बाबासाहेबांनी चालवलेली वृत्तपत्रे-

1. मूकनायक :- ३१ जानेवारी १९२०
2. बहिष्कृत भारत :- ३ एप्रिल १९२७
3. जनता :-१९३०
4. प्रबुद्ध भारत :- १९५६

बाबासाहेबांनी एकुण चार वृत्तपत्रांची स्थापना केली. शतकानुशतके मूक अवस्थेत जगणाऱ्या स्थितीला दर्शवण्यासाठी, ती अधोरेखित करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम नाव निवडलं ते मूकनायक… वंचित जगताचा नायक.. मूकनायक.

त्यानंतर भारत ही संकल्पना मांडताना भारताच्या अंतर्गत वसणाऱ्या बहिष्कृत भारताची ओळख त्यांनी इथल्या पत्रकारितेला करून दिली.

जसजसा वेळ गेला. बाबासाहेबांच्या चळवळीत अस्पृश्यांसोबत, ब्राह्मण व ब्राह्मणेतरांचा सहभाग वाढत गेला तेव्हा त्यांनी जनता नावाचे पत्र सुरू केले. पुढे याच जनता चे रुपांतर प्रबुद्ध भारत असे ठेवले. भारत एक राष्ट्र म्हणून इथल्या मागासवर्गीयांवर बिंबवण्याचे सर्वात मोठे क्रेडीट हे फक्त बाबासाहेबांकडे जाते. त्यासाठी त्यांनी निवडलेली नावं, त्यांचं ब्रँडिंग फार महत्त्वाची भूमिका निभावते.

बाबासाहेबांनी चालवलेले राजकिय पक्ष-
बाबासाहेबांचे तीन राजकिय पक्ष होते. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. स्वतंत्र मजूर पक्षात सुरूवातीला जरी अस्पृश्यांचा भरणा असला तरी पक्षाचे नाव आणि त्यातील मजूरांच्या स्वतंत्र होण्यासंबंधीची ग्वाही आणि आवाहन फार मोठा रोल प्ले करत होते. स्वतंत्र मजूर पक्षाने कामगारांच्या आयुष्यात, त्यांच्या आंदोलनात आमूलाग्र बदल घडवून आणले होते. पुढे जाऊन शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. यात देशातील तमाम शेड्यूल कास्ट मधील जातींना राजकिय पटलावर एकत्र आणून त्यांना त्यांचे राजकिय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी पिन पॉईंट होईल असे नाव निवडले. शेड्यूल कास्ट फेडरेशन.. दोन आकडी खासदार आणि आमदार होते त्यावेळेस. काँग्रेसनंतर देशातला सगळ्यात मोठा पक्ष होता शेकाफे. त्यानंतर 1956 साली बुद्धाचा स्विकार करतेवेळी बाबासाहेबांनी जातीय समीकरणांसाठी बनवलेल्या पक्षाला स्वतः विसर्जित करण्याचं प्लानिंग केलं. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. यात आंतरराष्ट्रीय पटलावर राजकारण करणारा राजकिय पक्ष बाबासाहेबांना अपेक्षित होता.

बाबासाहेबांची पुस्तकं, त्यांची शीर्षकं, त्यांनी लिहीलेली प्रकरणं, त्यांनी वापरलेल्या टर्मिनोलॉजी सारं काही अतिशय सुटसुटीत, स्पष्ट, सामान्य जनांना उच्चार करता येईल असेच होते. त्या नावांचा, संकल्पनांचा कुठेही वावगा अर्थ काढला जाणार नाही, त्याच्या उच्चार अपभ्रंश होणार नाही याची त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतलेली आढळते. त्यांच्या विचारसरणीत सर्वसमावेशकता होती. म्हणून स्वतः स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थेचं नाव त्यांनी जनतेला अर्पण केलं.. संस्थेचं नावं ठेवलं…

दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी…

आणि आपण…म्हणतो..
निळा भडक
टिळा कडक
जय भीम…
तुम्हीच सांगा काही चूकीचं बोलतोय का?

#ThanksAmbedkar

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s