असा असावा सहचर

माणूस कितीही मोठा असला तरी बायकोपुढं तो तीचा नवरा असतो. हक्काचा मित्र असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही वेगळं नव्हतं. बाबासाहेब कोलंबियाहून परतले. चळवळीत पूर्णवेळ उतरण्याआधी त्यांनी स्वतःला एका चांगल्या वकिलाच्या स्वरूपात स्थापन करण्यात आपली पूर्ण ताकद लावली. बाबासाहेब कित्येकदा सकाळी सात ला घरातून निघाले तर रात्री पार एक दोन वाजता घरी येत. अशातच त्यांना विधी महाविद्यालयात म्हणजे आजच्या जीएलसी (लॉ कॉलेज) ला व्याख्याता म्हणून काम करण्याचं निमंत्रण मिळालं. बाबासाहेबांनी ते स्विकारलं. कालांतराने ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य देखील झाले. पण हा किस्सा त्यांच्या व्याख्याते असण्याच्या कालखंडातला.

त्यावेळेस डॉ. आंबेडकरांचे लेक्चर म्हटलं की, बाहेरच्या अनेक कॉलेजेस मधून विद्यार्थी, प्राध्यापक जातीनं हजेरी लावत. त्यांच्या व्याख्यानांच्या नोट्सवर अनेकदा बॉम्बे क्रॉनिकल्स मध्ये आर्टिकल छापून येत. खूप मोलाचे डॉक्युमेंट होते ते. पण कुणीही सांभाळून न ठेवल्याने आता ते उपलब्ध नाहीत. तर बाबासाहेबांना या व्याख्यानांचं बऱ्यापैकी मानधन मिळायचं. मानधन मिळालं की, बाबासाहेब ते आणून सरळ रमाईंच्या हातात देत असत. आता तेवढ्यावर रमाईचं मन भागत नव्हतं. साधी भोळी माई ती. एकदा बाबासाहेबांना तडक म्हणाली, साहेब, तुम्हाला घरादाराची काळजीच नाही. कधीतरी भाजीपाला आणून द्यावा.. मीच एकटी काय काय करणार…
बाबासाहेब म्हणाले.. हो रामू…

बाबासाहेबांना गोल्ड स्टँडर्डवर प्रबंध लिहायला सांगितला असता तर सोप्पं वाटलं असतं. पण आता भाजीपाला घेऊन जायचा म्हटलं तर त्यांना थोडंसं कठिण वाटू लागलं होतं. भायखळ्यांच्या ज्या भाजीमार्केट मध्ये त्यांचं रमाईसोबत लग्न झालं होतं त्या ठिकाणी गेले बाबासाहेब. अडतीस रुपयाचा भाजीपाला घेतला. एक छोटी मोळी बसेल एवढे बोंबील, कोथिंबीर, मेथी अन् इतर भाज्यांच्या पंधरा पंधरा जुड्या घेतल्या. बरीच फळं पण घेतली. स्वारी खुश होती. आज रामू पुन्हा टोकणार नाही हा विचार मनात डोकावूनच ते घरी निघाले.

बीडीडी चाळीतल्या घरात येताच बाबासाहेबांच्या हातातलं सामान पाहून रमाई जी वैतागली त्याला तोड नव्हती. बाबासाहेब म्हणाले, मी महिनाभर पुरेल इतकं सामान आणलंय, आता तरी खुश…

रमाई म्हणाली.. ते बोंबील आता तीनेक दिवसात खराब होतील. ह्या भाज्या उद्यापर्यंत खराब होतील. हे असलं रोज थोडं थोडं आणायचं असतं. तरी रमाईनं हिशोब विचारलाच… किती पैसे झाले.. बाबासाहेब उत्तरले अडतीस रुपये.. पुन्हा रमाई चक्रावली.. म्हणाली.. पंचवीस रुपयाच्या जिन्नसा तुम्हाला महागात विकल्या. यानंतर परत बाजारहाट करायचा नाही तुम्ही.

थोडा वेळ असाच गेला.. बाबासाहेब स्वतः बसले रमाईसोबत. भाज्या विलग केल्या. बोंबील ही जुडीने बांधले. स्वतःपुरते ठेवले. आणि बाकीचे पोयबावाडीतल्या शेजाऱ्यांना वाटले.

स्वतः भाजी खुडून देणाऱ्या बाबासाहेबांना नंतर रमाईनं कधीच परत असल्या कामांसाठी तगादा लावला नाही. ती मनोमन खुश होती. अन् बाबासाहेबही.
त्या दोघांमधल्या प्रेमाचं नातं भलतंच विलक्षण होतं.

*संदर्भासाठी कीर लिखित आणि खैरमोडे लिखित खंड चाळता येतील.

वैभव छाया

‪#‎ThanksAmbedkar

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s