विद्वान बाबासाहेब

विद्वान कोणाला म्हणावं बरं? नव्या वाटा चोखाळणाऱ्या माणसाला की, रि-सर्च करून नाव मिळवणाऱ्या माणसाला.. बाबासाहेबांचं कोलंबियाचं शिक्षण तर पाहीलंच. आता जरा त्यांच्या शिक्षणातील महत्त्वाच्या अचिव्हमेंट्स पाहू.

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास जातीतील पहिले वकिल होते.

2. डॉ. आंबेडकर हे असे पहिले भारतीय होते की ज्यांनी कोणत्याही परदेशी विद्यापीठात अध्ययन करून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती.

3. बाबासाहेब स्वतः संस्कृत भाषापंडित होते. आणि ही भाषा ते जिद्दीने स्व-अध्ययन करून शिकले. अस्पृश्यांना संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार नव्हता.

4. बाबासाहेब 1907 साली मॅट्रिकची परिक्षा पास झाले. त्या परिक्षेत त्यांना 750 पैकी फक्त 280 गुण मिळाले. ते 280 गुण प्रचंड मोठे होते. कारण महारांमधून मॅट्रिक होणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉ. आंबेडकर…

5. मे-१९१६ मधे डॉ. गोल्डनवेझर यांच्या सेमीनारमधे “Caste In India, Their Mechanism, Genesis & Development ह्या विषयावर त्यानी एक निबंध वाचला. या निबंधानं अमेरिकेतली बुद्धिजीवी वर्गात प्रचंड खळबळ माजवली. जातीव्यवस्थेच्या या क्रुरपणाचा अमेरिकेतील विद्यापीठातून जाहीर निषेध होण्याची पहिलीच वेळ होती. बाबासाहेबांमुळे भारतीय समाजव्यवस्थेची किड जगासमोर आली.

6. जुन-१९१६ ला “National Dividend of India-A Historical & Analytical Study हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला. ह्या प्रबंधाने प्रभावित झालेल्या कोलंबियातील लोकांनी त्यांच्या नावे शानदार मेजवानीचं आयोजन देखील केलं होतं. आणि स्वतःच्याच देशात मात्र अपमान पदरी पडला.

7. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डी. एस्सी. म्हणजे डॉक्टरेट ऑफ सायंस मिळवणारे बाबासाहेब हे भारतातील पहिले व्यक्ती.

8. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा आणि तत्त्वज्ञान ह्या सहा क्षेत्रांत बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

9. वरिल सहाही क्षेत्रात त्यांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवल्यात. त्यांनी सादर केलेले प्रबंध इतके महत्त्वाचे होते की त्याकाळी ब्रिटनमधल्या टॉपमोस्ट प्रकाशकांनी ते प्रबंध पुस्तकरुपाने प्रकाशित केले. त्यातील कित्येक प्रबंध आज पन्नासहून अधिक आवृत्त्या निघूनही पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहेत.

10. बाबासाहेबांच्या इंग्रजी भाषेचे खरे गुरू हे त्यांचे वडिलच होते. त्यांच्या शिक्षणासाठी सर्वस्वी जबाबदार त्यांचे वडिल रामजीबाबाच.

आजी कधी कधी गाते.. ओ रामजी… तेरे भीम ने बडा सुख दिया..
लोकं म्हणतात उत्तर भारतात.. अगर रामजी बाबा न होते.. बाबा भीमजी हमें ना मिलते…

हे असे होते आपले बाबासाहेब…

वैभव छाया

#ThanksAmbedkar

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s