About

जाहीर डिसक्लेमर..
माझा ब्लॉग स्पेस हा सर्वांसाठी ओपन आहे. माझं स्वतःचं एक असं राजकारण आहे. माझी भूमिका आहे. ती प्रत्येकालाच पटेल असा माझा अट्टाहास नाही. मी जातनिर्मूलनाच्या चळवळीशी बांधील आहे. त्यामुळे जातींवर लिहीणारा जातीयवादी असा बहुसंख्यांकांच्या परिप्रेक्ष्यातून आलेला समज मी खोटा मानतो. तसेच मी लिहीत असलेल्या कोणत्याही पोस्ट अथवा लेखांतून किंवा करत असलेल्या कृतीतून तुमच्या जातीय अस्मिता दुखावल्या जात असतील तर त्यासाठी मी जबाबदार नाही. याउपर तुम्ही या वॉलवर येणे टाळलेले बरे. ज्यांच्या भावना लगेच दुखावतात. त्यांच्या जातीय अस्मिता जाग्या असतात. जातीय अस्मिता जाग्या असलेले लोक हे प्रचंड जातीयवादी असतात. त्यांनी इथं येऊन आपल्या भावना दुखावून घेऊ नयेत. त्यासोबत एकमेकांच्या प्रामाणिकपणाची मापं काढू नयेत. पटल्यास घ्यावे अथवा अनफ्रेंड करावे. कोणाच्याही गुड बुक्स मध्ये राहण्याची मला गरज नाही. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. ते मलाही आहे. मी फक्त सरळसोट बोलून ते व्यक्त केलंय. बाकी आपण सूज्ञ आहात.

काही तांत्रिक अडचणींमुळे मला माझा जुना ब्लॉग सम्यक समीक्षा डिलीट करावा लागला. परंतू तेथे असलेले सर्व कंटेट येथे क्रमाक्रमाने अपडेट करत राहील.

Advertisements